आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केले. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केले, या अर्थसंकल्पात अनेक मुद्दे मांडण्यात आले. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पुढची 5 वर्षे विकासाची संधी देणार असं म्हटलं आहे.
तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत, मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत असताना म्हणाल्या आहेत. या बजेटमध्ये गरीब, युवक आणि महिलांकडे लक्ष देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे.
आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रासाठी घेतलेले निर्णय
1. कस्टम्स ड्युटीतून 36 महत्त्वाची औषधं वगळली
2. सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे-केअर केंद्रे स्थापन, तर कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम्स ड्युटी हटवणार
3. 6 औषधांवर कस्टम ड्युटी 5% करण्यात येणार
4. 200 डे-केअर कॅन्सर केंद्रे उघडणार
5. नव्या योजनांसाठी 10 लाख कोटींची गुंतवणूक
6. जल जीवन मिशन 2028 पर्यंत वाढवण्यात आले
7. न्युक्लिअर एनर्जी मिशन
8. खासगी क्षेत्रासोबत भागीदारी करणार
9. 2047 पर्यंत 100 गिगावॉट न्युक्लिअर एनर्जी निर्मितीचे लक्ष
10. अणू क्षेत्रात संशोधन आणि विकाससाठी 20 हजार कोटींची तरतूद
11. 2033 पर्यंत अणुभट्ट्या कार्यरत होणार, तर स्वदेशी बनावटींनी तयार केलेल्या अणू भट्ट्यांसाठी 20 हजार कोटी